शंका व समाधान
|
|
प्रश्न |
उत्तरे |
क्रेडिट
सोसायटी ही रिझर्व्ह बॅंकेच्या अधिपत्यात काम करते का? |
क्रेडिट सोसायटी ही पुर्णपणे
डिपार्टमेंट ऑफ को.
ऑपरेटीव्ह क्रेडिट सोसायटी
यांच्या अधिपत्यात काम करते. |
बचत खाते
उघडण्यासाठी सभासद होणे गरजेचे आहे का? |
होय, आमच्याकडे बचत खाते किंवा इतर
कोणतेही खाते उघडण्यासाठी कमितकमी नाममात्र सभासद होणे गरजेचे आहे. |
सभासद
होण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या ओळखीची गरज आहे का? |
होय, आमच्याकडे सभासद होण्यासाठी
सध्याच्या दोन (2) सभासदांच्या संदर्भांची व सभासद अर्जावर त्यांची
स्वाक्षरी करण्याची गरज आहे. |
सभासद
होण्यासाठी इतर कोणत्या प्रकारच्या माहितीची गरज आहे का? |
सभासद होण्यासाठी पुर्णपणे भरलेला अर्ज, आधार कार्ड, पॅन कार्ड,
रहात्या घराच्या पत्याचा पुरावा व सभासद होण्यासाठीची रक्कम यांची गरज
आहे. |
ज्येष्ठ
नागरिक व अपंग यांच्यासाठी काही सवलत आहे का? |
ज्येष्ठ नागरिक व अपंग यांच्यासाठी
आपल्या ठेवींच्या खात्यातून वाढीव व्याज दिले जाते. कृपया
ठेवींचा
प्रकार पहावे. |
कर्ज
घेण्यासाठीपण अगोदर सभासद होणे गरजेचे आहे का? |
होय, कर्ज घेण्यासाठी व कर्जासाठी अर्ज करण्याआधीपण कमीतकमी नाममात्र
सभासद होणे गरजेचे आहे का? सभासद होण्यासंबंधीची माहिती वर दिली आहे. |
मला
प्राप्त झालेला इतर बॅंकेचा धनादेश (मिळालेला इतर बॅंकेचा चेक) मी
आपल्याकडील माझ्या खात्यात भरू शकतो का? |
होय, रु.50,000/- पर्यंतचा तुम्हाला
प्राप्त झालेला इतर बॅंकेचा धनादेश (मिळालेला इतर बॅंकेचा चेक) तुम्ही
आमच्याकडील तुमच्या खात्यात भरू शकता व रु.50,000/- वरील चेक हा तुम्ही
कांचनगौरी महिला सहकारी पतपेढी मर्यादित या नावाने घेऊन तुम्ही
आमच्याकडील तुमच्या खात्यात भरू शकता. |
आपल्या
संस्थेत सभासद झाल्यावर मी लगेच कर्ज घेण्यासाठी पात्र होऊ शकतो का? |
नाही, कर्ज घेण्यासाठी आपण, आमच्या
संस्थेत सभासद झाल्यावर आपण 6 महिन्या नंतर कर्ज घेण्यासाठी पात्र होऊ
शकता. |
मी आपल्या
कोणत्याही शाखेत जाऊन, एका कोणत्याही शाखेतील माझ्या खात्यात पैसे भरू
शकतो का? |
होय, आपण आमच्या कोणत्याही शाखेत जाऊन,
एका कोणत्याही शाखेतील आपल्या खात्यात पैसे भरू शकतो. |
आपल्याकडे
मौल्यवान वस्तू व कागदपत्रे ठेवण्यासाठी सेफ डिपॉझीट लॉकर आहेत का? |
होय, आमच्याकडे मौल्यवान वस्तू व
कागदपत्रे ठेवण्यासाठी सेफ डिपॉझीट लॉकर
आमच्या मुख्य शाखेत आहेत. |
|
वरती |